मोठी बातमी; कुख्यात गुंड शरद मोहोळची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

लग्नाचा वाढदिवसाच्या दिवशी खून...

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. पुण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला. आज दुपारी कोथरूड परिसरात शरद मोहोळ वर गोळीबार करण्यात आला. बाईकवरून हल्लेखोर आले व त्यांनी शरद मोहोळवर तीन वेळा गोळ्या झाडल्या.

सह्याद्री रुग्णालयात शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात शरद वर हल्ला करण्यात आला. दरम्यान गुंड शरद मोहोळचा मृतदेह पुण्यातील पुण्यातील ससून रुग्णालयात आणण्यात आला आहे. गोळीबारामध्ये मोहोळचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मोहोळचा मुक्त देह ससूनमध्ये नेण्यात आला. या ठिकाणी मोहोळ समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ससूनमध्ये तैनात करण्यात आलेला आहे.

लग्नाचा वाढदिवसाच्या दिवशी खून…
आज शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं सांगण्यात येत आहे. दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शरदला पाहताच गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि तेथून पळ काढला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोण होता शरद मोहोळ ?

संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळ गुन्हेगारी जगात समोर आला. या गोष्टीला १५ ते १६ वर्ष झाली. शरद मोहोळ मुळाशी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास होता. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई- वडील शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधी काम करत होता. मात्र पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली त्यांनतर शरद मोहोळ याचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.