शनिपेठ मध्ये झालेल्या दंगलीत पोलीस कर्मचारी जखमी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शनिपेठमधील काट्याफईल भागात मध्यरात्री दोन वाजता दोन गटात तुफान दंगल उसळली. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. त्यात दोन्ही गटात हाणामारी होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले.

एकमेकांवर दगडफेक तसेच दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. त्यात शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी व मुकुंद गंगावणे हे दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक संदीप गावित यांच्यासह शहरातील अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला अजून, नियंत्रण कक्षेतून अतिरिक्त कुमक मागविण्यात आलेली आहे. रात्री दहा वाजता दोन गटात वाद झाला. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला होता. त्यानंतर पुन्हा दोन वाजता वाद उसळून आला. दोन गट समोरासमोर आले. दगडफेक व बियरचा बाटल्यांचा मारा करण्यात आला. संशयितांवर कारवाई करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.