शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चा ट्रेलर रिलीज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूड किंगखान शाहरुख, दीपिका आणि जॉन अब्राहमचे फॅन्स पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. यशराज फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ चित्रपटाची आठवण होईल. ‘वॉर’ आणि ‘पठाण’ या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमधील शाहरुखच्या आणि जॉनचे डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत, तर दीपिकाचे ग्लॅमरस लूक्स देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ‘एक सोल्जर ये नहीं पूछता देश ने उसके लिए क्या किया है। पूछता है वो देश के लिए क्या कर सकता है!’ हा शाहरुखचा ट्रेलरमधील डायलॉग अनेकांचे लक्ष वेधत आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये ‘पठाण’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.