हृदयद्रावक; तो पहिल्या दिवशी शाळेत तर गेला… मात्र कधीच परतणार नाही…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

उन्हाळी सुट्ट्या संपल्या कि मुलांना शाळेची ओढ लागते. त्यानुसार त्यांची तयारी सुरु होते. म्हणजे अगदी नव्या वह्यांपासून ते दप्तर ते नवीन गणवेश यामुळे त्यांचा उत्साह हा द्विगुणीत असतो. आजपासून सीबीएससी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोवळ येऊन खाली पडल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सुयोग भूषण बडगुजर वय 13 वर्ष असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,  सुयोग हा शहरातील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. आज शाळेचा पहिला दिवस होता. तो शाळेत गेला. मात्र त्यानतंर काही वेळातच त्याला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. सुयोग हा गेल्या दोन वर्षांपासून हायपर टेन्शन व उच्च रक्तदाबाने त्रस्त होता. त्याला पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जाणार होते. त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. अत्यंत हुशार अशा सुयोगच्या निधनाने शाळेसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.