पाचवी, आठवीची शिष्यवृती परीक्षा 31 रोजी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 

राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) ही दि. 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. परंतु सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्यस्थिती बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने. विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थीहित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता, सदर परीक्षा दि. 20 जुलै ऐवजी रविवार, दि. 31 जुलै रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,  असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.