SBI चा ग्राहकांना धक्का ! कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण SBI ने आज एक मोठा निर्णय घेतल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. फंड-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) आणि बेस रेटची मार्जिनल कॉस्ट वाढवण्याचा हा निर्णय आहे. यामुळे एसबीआयच्या कर्जाच्या व्याजदरामध्ये मोठी वाढ झाली आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

एखादी बँक कमीत कमी किती व्याजदराने कर्ज देऊ शकते हे MCLR दरावर अवलंबून असतं. यापूर्वी SBI चे बेस रेट हे 10.10 टक्के होते, जे आता 0.15 टक्क्यांनी वाढवून 10.25 टक्के झाले आहेत. यामुळे कंझ्युमर लोन हे 0.10 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

व्याजदर कसे वाढले ?

MCLR-आधारित व्याजदर आता 8% ते 8.85% या दरम्यान असणार आहेत. ओव्हरनाईट MCLR रेट हे पूर्वीप्रमाणेच 8% असणार आहेत. एक ते तीन महिन्यांसाठीचे MCLR दर हे 8.15 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आले आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर हे 8.45 टक्क्यांवरुन 8.55 टक्के करण्यात आले आहेत. एका वर्षाच्या कालावधीसाठी असणारे MCLR दर हे 8.55% वरुन 8.65% करण्यात आले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणारे MCLR दर हे 8.65% वरुन 8.75% करण्यात आले आहेत. तर तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणारे MCLR दर हे 8.75 टक्क्यांवरुन 8.85 टक्के करण्यात आले आहेत.

साधारणपणे कंझ्युमर लोन हे एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीचे असतात. या सर्व कर्जांच्या व्याजदरामध्ये 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा मोठा फटका कर्जदारांना बसणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.