श्री गुरुद्वारा साहेब कमेटी करणार संत नामदेव महाराजांच्या पालखीचे स्वागत…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रेरणास्त्रोत संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७३ व्या संजीवन समाधी सोहळा दि. १५ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून,   श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने जोरात तयारी सुरू असून, जळगाव शहरातील १४०० घरोघरी समाज बांधवांपर्यंत कार्यकर्ते कार्यक्रमाची निमंत्रण दिले आहे.

काल दि. ९ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता श्री गुरुद्वारा साहेब कमेटी जळगाव येथे सालाबाद प्रमाणे सोहळ्याचे निमंत्रण गुरुद्वारा प्रबंध कमेटीचे खजानसिंग छाबडा, तेजदरसिंग महेंद्र, ग्याज्ञी गजेन्द्र सिंग, ग्याज्ञी जतसिंग यांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, मा.अध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, दिलीप भामरे, दिनेश खैरनार, अशोक सोनवणे, सुधीर शिंपी, दिलीप सोनवणे, चेतन खैरनार आदी उपस्थित होते.  या प्रसंगी गुरुद्वारा कमिटीच्या वतीने सांगितले की, संत नामदेव महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत आमच्या तर्फे श्री गुरुद्वारा साहेब येथे करण्यात येईल, व १५ जुलै रोजी संत नामदेवांच्या अभंग वाणीची सुद्धा त्यादिवशी कीर्तन  करण्यात येईल. यामुळे दोघे समाजाचे मिलन या दिवशी होईल व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सर्व समाजांपुढे ठेवता येईल. असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.