चारित्र्याच्या संशय घेत पत्नीवर धारधार शस्राने वार

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रत्येक घरात पती व पत्नीचे छोट्या-मोठ्या कारणाने नेहमी भांडण होत असतांना पण अमळनेर शहरातील एका परिसरातील पत्नी व पतीमध्ये झालेल्या भांडणातून थेट खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पतीविरोधात अमळनेर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनुसार, अमळनेर शहरातील शहरातील एका परिसरात १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पती घरी आला असता त्याने घराबाहेर बसलेली पत्नी फोनवर मुलीशी बोलत असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेलं आहे. त्यानंतर आपल्या पॅन्टच्या खिशातून चाकू काढत पत्नीच्या गळ्यावर वार केले आहे. यामुळे पत्नीच्या दोन्ही हातावर वर करून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पती विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.