शाहरुखने वाढदिवशी दिला चाहत्यांना ‘हे’ मोठं गिफ्ट !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठी भेट मिळालेली आहे. अभिनेत्याच्या अगामी ‘डंकी’ या सिनेमाचा टीझर आउट झाला आहे. ‘डंकी’चा टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं आहे. त्याचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता अभिनेत्याच्या आगामी डंकी या सिनेमाची प्रेक्षांना प्रतीक्षा आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

शाहरुखने शेअर केला ‘डंकी’चा टीझर
डंकी या सिनेमाचा टीझर शेअर करत शाहरुखने लिहलं आहे. “स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या साध्या आणि वास्तविक लोकांची गोष्टी मैत्री, प्रेम आणि नातं म्हणजेच कुटुंब. हृदयस्पर्शी कथाकाराची हृदयस्पर्शी कथा. या प्रवासाचा एक भाग बनणे हा एक सन्मान आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आमच्यासोबत याल. येत्या नाताळात ‘डंकी’ जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होईल”.

Leave A Reply

Your email address will not be published.