संभाजीनगर येथे भीषण अपघात, दुचाकीने घेतला जागेवरच पेट

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातांचं प्रमाण सतत वाढत आहे. आतासुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शेवगाव मार्गावर आज दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे. यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दुचाकीने पेट घेतला आहे. पैठणकडून शेवगावकडे जाणाऱ्या व शहराकडून पैठणकडे येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीने जागेवरच पेट घेतला.

या अपघातात एकाच मृत्यू झालाय, तर अन्य जखमी झालेल्या लोकांना पुढील उपचारासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात लाखोरी येथे देखील दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला होता. या घटनेत एकजण ठार तर ४ गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या. कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.