देशात ‘किसी का भाई किसी की जान 4500 स्क्रीन्सवर रिलीज

0

मुंबई –आज सलमान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सलमान खान मागील काही दिवसांपासून ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो चार वर्षानंतर मोठ्या पड्यावर पुन्हा दिसणार आहे.नेहमीप्रमाणे यंदाही सलमानचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. जगभरात हा सिनेमा 5700 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.देशात हा सिनेमा 4500 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. एका दिवसात या सिनेमाचे तब्बल 1600 शो दाखवले जाणार आहेत. 100 देशांमध्ये हा सिनेमा 1200 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे.

दरम्यान, सलमानच्या या चित्रपटाकडून अनेकांना खूप अपेक्षा आहे. कारण बॉलीवूड चित्रपट मागील काही काळापासून अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ‘पठाण’ प्रमाणे ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाला देखील प्रेक्षक भरभरुन प्रेम देणार का? पाहावे लागणार आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी याचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.