यावल ;- मौजे साकळी ता.यावल येथे कृषी विभाग यावल व नेवे फार्मर प्रोडूसर कंपनी लि. आज दि 9 रोजी गुरुवार सकाळी 10 वाजता संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत रबी हंगामातील हरभरा बियाणे पिक प्रात्यक्षिक वाटप तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य 2023 निमित्त उपस्थित शेतकऱ्यांना ज्वारी मिनिकिट वाटप करण्यात आले.बीज प्रक्रिया मोहीम अंतर्गत मा. तालुका कृषी अधिकारी श्री भरत वारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सीड ड्रम द्वारे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक घेऊन बीज प्रक्रियेचे महत्त्व व बियाणे उगवण क्षमता चाचणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.यावेळी श्री.अजय खैरनार म.कृ.अ.किनगाव ,श्री ए.के नारखेडे कृ.प श्री.किरण वायसे कृ.प श्री.एच.पी चौधरी कृ.स.श्री एम.एस मिटके व फार्मर प्रोडूसर कंपनीचे सभासद श्री प्रणय नेवे,मनोज खेवलकर, चंद्रकांत नेवे व इतर शेतकरी हजर होते.
यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो असे यावल तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी सांगितले
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.