लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर एस व्यंकटरामनन यांचे वयाच्या ९२ च्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे दोन मुली आणि त्यांचा परिवार आहे. बिझनेस लाईनने यासंबंधित माहित दिली आहे.
एस व्यंकटरामनन हे आयबीआयचे १८ वे गव्हर्नर होते. त्यांनी १९९० ते १९९२ दरम्यान दोन वर्ष हा पदभार सांभाळला होता. याआधी त्यांनी अर्थ मंत्रीलायमध्ये १९८५ ते १९८९ या काळात अर्थ सचिव म्हणून कार्य केले हुते. गव्हर्नर असतांना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं सांगितले जात आहे.
आरबीआयचे गव्हर्नर याशिवाय एस व्यंकटरामनन यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते राज्य आणि केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक बाबींवर अनेकदा सल्ला दिला.