युक्रेनमध्ये अडकलेल्या जळगावातील विद्यार्थ्यांची यादी प्राप्त

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव कायम असून युद्धामुळे युक्रेनमध्ये मानवी संकट निर्माण झाले आहे. भारतासह अनेक देशातील नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. दरम्यान आतापर्यंत १२००० लोकांना मायदेशी आणण्यात यश मिळाले आहे. मात्र अद्यापही अनेक भरतीयांना मायदेशी आणण्याचे पर्यंत केंद्र सरकार करीत आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

जळगाव जिल्ह्यातील १९ विद्यार्थी युक्रेनला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून यातील 5 विद्यार्थी भारतात परतले. तर ६ सीमेलगत आहेत तर ६ सुरक्षित आणि मार्गावर आहेत. दरम्यान, दोघांचा मोबाईल बंद असल्याची देखील माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार निकीत आमले, शोएब राशीद काकर, सुरज शिंदे, देवांग किशोर वाणी, बरीरा युसूफ पटेल हे विद्यार्थी भारतात परतले आहेत. यापैकी काही विद्यार्थी आपल्या स्वगृही देखील पोहचले आहेत.

सौरभ विजय पाटील, ओम मनोज कोल्हे, मुस्कान रामशंकर जैस्वाल, श्रद्धा आनंद धोनी, लोकेश विजय निंभोरे, क्षितिजा गजानन सोनवणे हे विद्यार्थी पोलंड सीमेलगत आणि हंगेरीजवळ आहेत.

तसेच विजय दिलीप परदेशी, प्रसन्ना संजीव निकम, कल्याणी छगनराव पाटील, रोहन सुनील चव्हाण, यश राजेंद्र परदेशी, शिमा फतेमा शेख अन्सार हे विद्यार्थी सुरक्षित आहे. यश हा होस्टेलच्या भूमिगत बंकरमध्ये आहे.

जिल्ह्यातील निलेश योगराज पाटील, सुमित सुरेशचंद्र वैश्य या दोन विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.