रोटरीचे वैद्यकीय शिबिर; मुंबईत ३५ मुलांची मोफत शस्त्रक्रिया

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव एस.आर.सी.सी.हॉस्पिटल मुंबई आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये आयोजित १४ वर्षांपर्यतच्या आर्थिक दृष्ट्या वंचित लहान मुलांच्या वैद्यकीय तपासणी शिबिरातील ३५ मुलांच्या मुंबईत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
रविवार, २२ रोजी सकाळी ९ वाजता शिबिराचा शुभारंभ आय.एम.ए.जळगावचे अध्यक्ष डॉ.दीपक आठवले, मानद सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे, माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, सहप्रांतपाल अरुण नंदर्षी यांच्याहस्ते करण्यात आला. व्यासपीठावर रोटरी जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुलकर्णी, रोटरी बॉम्बे नॉर्थच्या अध्यक्षा नफिसा खुराकीवाला, कॅन्सर सर्जन डॉ.अंजली पाटील, डॉ.प्रिया प्रधान, डॉ.राकेश कोपटे, गौरव मेघानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात मुंबई येथील ज्येष्ठ कार्डियाक सर्जन डॉ.जी.एन.राचमाळे, कॅन्सर सर्जन डॉ.अंजली पाटील, डॉ.प्रिया प्रधान, जळगाव येथील डॉ.नंदिनी आठवले, डॉ.मिलिंद वायकोळे, डॉ.शशिकांत गाजरे, डॉ.सुनील सूर्यवंशी, डॉ.ज्ञानेश पाटील, डॉ.तुषार फिरके, डॉ.जयंत जहागिरदार, डॉ.अंजिक्य पाटील, डॉ.आदित्य जहागिदार यांनी रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी १२५ रुग्णांची नोंदणी तर ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३५ बाल रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्यामुळे मुंबई येथे त्यांना येण्या-जाण्याच्या खर्चासह पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. मोफत औषध वितरणाची जबाबदारी विजय जोशी व क्लिंटन (यू.एस.ए.) यांनी सांभाळली.
नोंदणी व संचालनाची धुरा रितेश जैन, पराग अग्रवाल, हेमंत भंगाळे, चंदन महाजन, हेमिंन काळे, योगेश चौधरी, आकाश डोकानीया, प्रा.शुभदा कुलकर्णी, स्वाती ढाके यांनी सांभाळली. यशस्वीतेसाठी रोटरी बॉम्बे नॉर्थ क्लबचे शिरीष तारे, फिरोज काचवाला, नवल सराफ, रुकसाना खान यांच्यासह रोटरी क्लब जळगावचे कॅप्टन मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, संदीप शर्मा, सुबोध सराफ, किशोर तलरेजा, विष्णूकांत मणियार, जितेंद्र ढाके, शाम अग्रवाल, उदय पोतदार, रणविरसिंग कलसी, मुकेश महाजन, पकंज व्यवहारे, आसिफ मेमन यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.