महासंस्कृती महोत्सवातील त्या घटनेवर रिंकूने प्रतिक्रिया देत केली विनंती…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या महा संस्कृती महोत्सवाचे काल जळगाव येथे समारोप झाला, यावेळी शहरात सैराट चित्रपट फेम रिंकू राजगुरू ही अभिनेत्री ही उपस्थित होती.

दरम्यान तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी भली मोठी गर्दी पोलीस कवायत मैदानावर केली होती. व आपल्या आवडत्या अभिनेत्री सोबत एक फोटो काढता यावा यासाठी अनेकांची भाऊगर्दी होती. याच दरम्यान कोणी तरी रिंकूचा हात ओढला व तिने संतापून प्रतिक्रिया दिली. असा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाला.

मात्र आता यावर खुद्द रिंकू ने आपल्या इंस्टाग्राम वर स्टोरी शेयर करत आपली प्रतीक्रीया दिली आहे. ती त्यात म्हटली आहे कि, “जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत. नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमाठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका representative शी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती. तुमची रिंकू” असे बोलून तिने सर्वांना याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांना थांबवण्याची विनंती केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.