फत्तेपुरात तीन धान्य गोदामे सील ; कारवाईने खळबळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गावातील तीन गोदाम रेशनचे धान्य ‎असल्याच्या संशयावरून प्रशासनाने हि गोदामे सील ‎केले आहेत. व्यापारी नाना इंगळे यांची हि गोदामे असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही‎ कारवाई सुरू होती.‎ दरम्यान, या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

व्यापारी इंगळे यांच्या गोद्री‎ रस्त्यावरील घराजवळ असलेल्या गोदामात‎ धान्य उतरवले जात होते. हे धान्य रेशनचे‎ असल्याच्या माहितीवरून पोलिस निरीक्षक‎ इंगळे यांनी घटनास्थळ गाठले. यानंतर‎ तहसीलदार अरुण शेवाळे यांनी पुरवठा‎ निरीक्षक वैराडकर व कर्मचाऱ्यांना‎ घटनास्थळी पोहचले. या गोदामासह‎ धामणगाव रोडवरील दोन गोदामे‎ प्रशासनाने सील केली. त्यापूर्वी‎ गोण्यांमधील धान्याचे नमुने घेण्यात आली आहेत.

‎तिन्ही गोदामात गहू, तांदूळ, तूर, मका‎ अशा स्वरूपाचे तब्बल तीन टन धान्य आहे. हा‎ माल शेतकऱ्यांकडून घेतल्याच्या पावत्या‎ आपल्याकडे आहेत, अशी माहिती‎ व्यापारी नाना इंगळे यांनी दिली. दरम्यान, याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल ‎झालेला नसून, धान्य रेशनचे आहे किंवा‎ नाही याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर‎ पुढील कारवाई होईल अशी माहिती पुरवठा‎ विभागाने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.