अकराशे किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी मातेच्या मूर्तीचे दिसले मनोहारी मूळ रूप

0
1
Saptasrungi Devi Original Look

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रियेनंतर देवीचे मूळ रुप समोर आले.

2
Saptasrungi Devi Look

संवर्धन प्रक्रियेनंतर देवीचे 1100 किलो शेंदूर काढण्यात आला. त्यानंतर वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे मूळ मनोहर रूप सर्वांना पाहायला मिळाले.

3
Saptasrungi Devi Original Form

गेल्या 45 दिवसांपासून ही मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.

4
Saptasrungi Devi Photo

आता संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून 26 सप्टेंबरपासून म्हणजेच घटस्थापनेपासून देवीचे मंदिर भाविकांना दर्शन खुले करण्यात येणार आहे.

5
Saptasrungi Devi Photos

मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू केल्यानंतर देवीच्या रूपावरील मागील कित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपनाचा भाग हा धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला.

6
Saptasrungi Devi Rup

सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन करण्यात आले होते.

7
Saptasrungi Devi

त्यानंतर पितृपक्षात 1600 देवी अथर्वशिर्ष पठण अनुष्ठान सर्व भक्तांच्या कल्याणासाठी म्हणून नवरात्रपूर्वी होणार आहे.

8
Idol Saptasrungi Devi

त्यामुळे 26 सप्टेंबरला म्हणजे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.