वनौषधी गुनौषधी ; शारीरिक व्याधींसाठी गुणकारी ‘जायफळ’

0

लोकशाही ऑनलाईन डेक्स : आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात.. सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. तर जाणून घ्या जायफळचे औषधीय गुण…जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं.
जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण जायफळ करतं. म्हणूनच आपल्या जेवणात, स्वयंपाकात जायफळचा वापर केल्यानं संक्रमण होण्याची शक्यता कमीच असते. एव्हढंच नाही तर जायफळचं पावडर कुठल्याही इंफेक्शनच्या ठिकाणी लावलं तर ती जखम किंवा इंफेक्शन बरं होतं.जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here