Jio ने लॉन्च केले दोन जबरदस्त प्रिपेड प्लान; ‘ही’ सेवा मिळणार फ्री

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. या कंपनीने दोन नवीन प्रिपेड प्लान लॉन्च केले आहे. या प्लानसोबत युजर्सला Disney+ Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. सोबत अनलिमेटेड कॉल, डाटा आणि एसएमसही सुविधा आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Disney+ Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्सला 4K कंटेंट मिळतो. युजर्स Disney+ Hotstar ला आपला मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि कनेक्टेड टीव्हीवर याचा वापर करू शकतील.

रिलायन्स जिओने 1499 रुपयांचा आणि 4199 रुपयांचे दोन प्रिपेड प्लान लॉन्च केले आहेत. 1499 रुपयांच्या प्रिपेड प्लान अंतर्गत ग्राहकांना एक वर्षांसाठी Disney+ Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते. तसेच दिवसाला 2 जीबी इंटरनेट डाटा, अनलिमेटेड कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएस मिळतात. या प्लानची वैधता 84 दिवसांची असून सोबत जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळते.

4199 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये एक वर्षांसाठी Disney+ Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते. तसेच दिवसाला 3 जीबी इंटरनेट डाटास अनलिमिटेड कॉल्स आणि दिवसाला 100 एसएमएसची सेवा मिळते. या प्लानची वैधता 365 दिवस असून यातही युजर्सला जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळते.

हा होईल फायदा

रिलायन्स जिओचे Disney+ Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन घेण्यासाठी युजर्सला वर्षाला 1499 रुपये मोजावे लागतात. मात्र 1499 रुपयांच्या प्रिपेड प्लानमध्ये हे प्रीमियन सबस्क्रिप्शन फ्री मिळते. शिवाय दिवसाला 2 जीबी डाटाही 84 दिवसांसाठी मिळतो. या रिचार्ज प्लानसोबत एक कूपन कोड दिला जाईल आणि तो माय जिओ अकाउंटमध्ये दिसेल. या कोडचा वापर करून तुम्ही Disney+ Hotstar ची फ्री सेवा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला https://www.hotstar.com/in/subscribe/promo वर जावे लागेल. जिओ नंबरवून साईन-इन केल्यानंतर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यावर कन्फर्मेशननंतर सबस्क्रिप्शन अॅक्टिव्ह होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.