Breaking : एरंडोलनजीक भीषण अपघातात

1

एरंडोल । प्रतिनिधी

जळगाव जिल्यातील एरंडोल नजीक पिंपळकोठा परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले.तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कार क्रमांक (एमएम १९ सीझेड ७३६०) पिंपळकोठ्याजवळ पुढे जात असलेल्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कार मधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान मयताची अद्याप नावे कळू शकली नाही. हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते. क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली.

 एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली . याबाबत माहिती अशी की , एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कार क्रमांक ( एमएम १ ९ सीझेड ७३६० ) पिंपळकोठ्याजवळ पुढे जात असलेल्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कार मधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे . दरम्यान मयतान मध्ये एरंडोल येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले फार्मसिस्ट जयदीप मदनसिंग राजपूत वय वर्षे 35 राहणार एरंडोल चतरसिंग पदमसिंग परदेसी वय वर्ष 40 राहणार जामठी विजय हरी परदेशी वय वर्षे 60 राहणार जामठी आबा पैलवान.
अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते . क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली ….

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    अती घाई संकरात नेई . झालेते फारच वाईट झाले . परमेश्वर अशी वेळ कोणावर आणू नये . भावपूर्ण श्रद्धांजली .

Leave A Reply

Your email address will not be published.