अरे बापरे ! लुडो गेमवरुन लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल कोणत्या कारणावरून वाद होतील हे सांगता येत नाहीत. असाच एक प्रकार मुंबईमधून समोर आलाय. चक्क लुडो खेळण्याच्या वादातून चर्चगेट लोकल मध्ये दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.

या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दहिसर लोहमार्ग पोलिसांनी हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. हाणामारी करणारे लोकलमधील नेहमीचे प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. या घटनेबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

गेमवरुन वाद

भाईंदर ते चर्चगेट लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आज सकाळी 11.30 वाजता भाईंदरवरुन चर्चगेट लोकल सुटली. त्यानंतर मीरा रोड ते दहिसर दरम्यान लोकल येताच लुडो खेळण्यावरुन दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचे हळूहळू हाणामारीत पर्यावसन झाले. यावेळी लोकलमध्ये उपस्थित अन्य प्रवाशांनी या हाणामारीचे मोबाईलमध्ये चित्रण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दहिसर लोहमार्ग पोलिसांनी दोघा प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करीत दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.