तरुणींसमोर हातवारे करत रील करणे तरुणाला पडले महागात, गुन्हा दाखल

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सोशल मीडियावर रिल्स तयार करण्याचं फॅड तरुण वर्गामध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशाच एका तरुणाने मुलींसमोर ‘पैसे फेक तमाशा देख’ या गाण्यावर रिल्स बनवलं. मात्र, असं रील तयार कारण कारण तरुणाला चांगलाच महागात पडलं आहे.

नेमकं काय घडलं ?
धुळे शहरातील देवपूर बस स्थानक परिसरामध्ये मुलींसोमोर ‘पैसा फेक तमाशा देख’ या गाण्यावर युवकाने अजब प्रकारचा डान्स करत रिल्स तयार केलं. यामुळे तरुण आणि तरुणींमध्ये एकच राडा झाला. या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या तरुणाला पकडले.

तरुणाने ज्या ठिकाणी रील तयार केलं. त्या ठिकाणी पोलीस या तरुणाला घेऊन गेले. त्या मुलींसमोर दोन्ही कां पकडून उठाबशा काढत बेडूक उड्या मारायला लावल्या. त्याचबरोबर ज्या मुलींना पाहून हावभाव करत रील केली होती. त्या सर्व मुलींच्या पाय पडून त्याला माफी देखील मागायला लावली आहे. माफी मागितल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या तरुणाला देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाची पुढील कारवाई देवपूर पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.