रेशन धान्य घेताय? मग शासनाचा हा निर्णय वाचाच…!

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी असून, कौटुंबिक परिस्थिती सुधारूनसुद्धा अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीमध्ये धान्य घेतात. उत्पन्न वाढूनही जे रेशन धान्य घेत असलेल्यांचं धान्य  बंद होणार आहे.

1 सप्टेंबरपासून धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होईल. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यासोबतच खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्याकडून मागील धान्याची वसुलीदेखील केली जाणार असल्याची माहिती आहे.

माणसांना अन्न मिळत नाही काहीजण रेशनधान्य जनावरांना खाद्य म्हणू वापरल्याचंही उघड झालं आहे. तरीही हे लोक रेशन धान्यावरील हक्क सोडण्यासाठी तयार नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकजण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही. अशा पद्धताने धान्य विकून ते सरकारची फसवणूक करत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.