‘महाभारत’ फेम अभिनेते रसिक दवेंच दुःखद निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाभारत फेम सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते रसिक दवेंच मुंबई येथे शुक्रवारी रात्री ८ वाजता निधन झालं.‘नंद’ या महाभारत मधील त्यांच्या पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले होते. तसेच मराठी व्यतिरिक्त गुजराती नाटके, गुजराती चित्रपट आणि अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले. सिने अभिनेत्री केतकी दवे यांचे ते पती होते. दोन वर्षांपासून ते डायलिसिसवर त्यांच्यावर उपचार सुरु होते.

जवळपास दोन वर्षे रसिक दवे मुंबई येथील रुग्णालयात डायलिसिसवर असून त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. अचानक त्यांची प्रकृती खूपच बिघडली. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्वीट करत रसिक दवे यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘किडनी निकामी झाल्यामुळे टीव्ही आणि चित्रपटांमधील अष्टपैलू अभिनेता आणि प्रिय मित्र रसिक दवे यांचे निधन झाले हे सांगताना खूप दुःख होत आहे. त्यांच्या पत्नी केतकी दवे आणि कुटुंबीय यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तुम्ही नेहमी स्मरणात राहाल.

Leave A Reply

Your email address will not be published.