रामजन्मभूमी सोहळ्याला हजेरी लावण्याऱ्या भक्तांसाठी करण्यात आली ‘ही’ खास सोय

0

अयोध्या, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशातील करोडो रामभक्त ज्या क्षणांची वाट पाहत आहोत, तो क्षण लवकरच अनुभवायला मिळणार आहे. अयोध्येतील भव्य-दिव्या राम मंदिराचे उदघाटन आणि प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे. सोहळ्याला ऐतिहासिक बनविण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश-विदेशातील संत, धर्माचार्य, आणि पाहुण्यांना मोठ्या संख्येने आमंत्रित केले जाणार आहे. एकीकडे मठ, मंदिरामध्ये संत आणि धर्मगुरूंच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे, तर दुसरीकडे इतर पाहुण्यांच्या निवासासाठी प्रयागराजमधील कुंभाच्या धर्तीवर अयोध्येत हायटेक सुविधांनी सुसज्ज टेंट सिटी उभारण्याची तयारी सुरु आहे.

राम मंदिराची किती तयारी झाली?
अयोध्येतील राममंदीराचा तळमजला आणि गर्भगृह तयार झाले आहे. २० ते २५ जानेवारी, या कालावधीत धार्मिक विधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश-विदेशातील सर्व धर्म, पंथ, आणि धर्मगुरूंना निमंत्रण पाठवले जाणार आहे. श्रीरामांचा अभिषेक सोहळा सुमारे नऊ दिवस चालणार आहे. ज्यामध्ये धर्मचार्य धर्मग्रंथानुसार धार्मिक विधी पार पडतील, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामांना गर्भगृहात विराजमान करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.