हतनूर धरणाचे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे – खा. रक्षा खडसे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्हाभरात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणातील पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात ओझरखेडा धरणाची पातळी कमी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्याच्या पार्श्वभूमीवर हि मागणी करण्यात आलेली आहे.

ओझरखेडा धरणाचे पाणी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासाठी राखीव असल्याने सदर धरणाची पातळी कमी झाली असता, शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचणी येत असून पाणी टंचाई निर्माण होते. पण यंदा मात्र मुबलक पाऊस पडल्याने हतनूर धरणातून पाणी वाहून जात आहे. जर हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी आताच ओझरखेडा धरणात सोडण्यात आले तर शेतकऱ्यांना पुरेशे पाणी मिळून त्यांची अडचण दूर होईल. असे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी म्हटले आहे.

हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याच्या संदर्भात मागील वर्षी वेळोवेळी मागणी करून सुद्धा पाणी सोडण्यात आलेले नव्हते व शेवटी सप्टेंबर महिन्यात फक्त २ दिवसांनी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास झाला होता. तरी यावेळेस आत्ताच सदर पाणी सोडण्यात यावे असे खासदार खडसे यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.