आ. किशोरआप्पा पाटील मंत्रिमंडळात ?

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून आणि बंडखोर शिंदे गट व भाजप मिळून नवे सरकार येऊन बराच काल लोटला आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडता अजून कुठल्याही मंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. अशातच राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणत खात मिळत आणि कोण मंत्रीपदी विराजमान होत याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. राहिला प्रश्न जळगाव जील्याचा तर जिल्ह्यातून शिवसेनेतील बंडखोर आमदारांपैकी कोणाला  मंत्रीपद मिळतय हा चर्चेचा विषय आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे व त्यांना आपल्या गुरुस्थानी मानणारे पाचोरा भडगाव चे आमदार किशोरआप्पा पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

तसेच आमदार गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री यापूर्वीही राहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्या नेत्याला शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळते, हे पुढे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. जळगाव जिल्ह्याला शिंदे गटातून दोन कॅबिनेट मिळणं कठीण दिसत आहे. मात्र आ. किशोर पाटील यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून समजते. आ. किशोर पाटील यांची ‘कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागावी, आ. किशोर पाटीलांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा मार्ग खडतर असला तरी राज्यमंत्री वर्णी निश्चित मानली जात असल्याचे देखील समजतेय. तसेच यासाठी कार्यकर्त्यांकडून देखील प्रयत्न सुरु आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.