रक्षाबंधनाला भावासह ‘या’ देवांनाही बांधा राखी !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा प्रतिक आहे. या दिवशी बहिण भावाला राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र रक्षा बंधनाच्या दिवशी भावाशिवाय देवतांनाही राखी बांधण्याची प्रथा आहे. यामागे देखील हिंदू धार्मिक शास्त्र आहे. तसेच या विशेष दिवशी, बरेच लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना आणि झाडे आणि वनस्पतींना राखी बांधतात. त्याचबरोबर काही लोक रक्षाबंधनाच्या दिवशी देवालाही राखी बांधतात. असा विश्वास आहे की या विशेष दिवशी देवाला राखी बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कोणत्या देवाला राखी बांधली पाहिजे हे जाणून घ्या –

गणपती बाप्पा : 

गणपती बाप्पाला प्रथम पुज्यनिय मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम गणपतीला राखी बांधली पाहिजे. गणपती बाप्पाला लाल रंगाची राखी बांधा. यानंतर तुमच्या भावाला ओवाळा आणि त्यांना राखी बांधा. लाल रंगाची राखी बांधल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते.

महादेव : 

रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. श्रावण महिना हा भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यात येतो.  म्हणून या दिवशी महादेवालाही राखी बांधली पाहिजे. महादेवाला निळ्या रंगाची राखी बांधावी. मान्यता आहे की या दिवशी भगवान शिव यांना राखी बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

भगवान श्रीकृष्ण : 

भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. यामुळे जेव्हा दुश्शासनाने द्रौपदीचे चीरहरण केले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले होते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला राखी बांधल्याने ते प्रत्येक परिस्थितीत तुमचे रक्षण करतात. द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधल्यापासून राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली होती. भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानत होते आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधा.

पवनपुत्र हनुमान : 

या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतो. या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे. बंजरंगबलीला राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊरायाला ओवाळून राखी बांधा. असे मानले जाते की राखी बांधल्याने कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होतो आणि शक्ती-बुद्धी प्राप्त होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.