गुड न्यूज.. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) पवित्र सण आहे. या शुभ मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. म्हणून आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे.  सोन्याच्या दरात (Gold Price) 10 ऑगस्टला तब्बल 600 रुपयांची घसरण झाली. तसेच आज कोणतीही दरवाढ झाली नाही.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,350 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,650 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,690 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,490 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,380 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,690 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 587 रुपये आहे.

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले असते.

22 कॅरेट शुद्ध सोन्यावर 916 लिहिलेले असते.

21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलेले असते.

18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलेले असते.

14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलेले असते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.