सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरातील छत्रपती शिवरायांचा फोटो चर्चेत !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
रजनीकांत हे चित्रपटांबरोबर राजकारण आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या ते चर्चेत आहेत त्यांच्या मुलीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे. रजनीकांत यांच्या घरातील छत्रपती शिवरायांच्या या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकताच रजनीकांत यांनी त्यांच्या कुटुंबियांबरोबर पोंगल हा सण साजरा केला. यावेळी सर्वच कुटुंबीय एकत्र होते. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे ४ फोटो पोस्ट केले आहेत.

ऐश्वर्याने केलेल्या पोस्टमधील चौथा फोटो हा घरातील असून त्यामध्ये ऐश्वर्या आई-वडिलांच्या म्हणजेच रजनीकांत आणि लता यांच्या पाया पडताना दिसत आहे. पालकांचा आशिर्वाद घेतानाचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. कारण या फोटोमध्ये रजनीकांत ज्या भिंतीसमोर उभे आहेत त्या भिंतीवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पूर्णाकृती फोटो दिसून येत आहे. एका पिलरवर हा फोटो दिसत असून छत्रपती शिवाजी महाराज गडावरुन उतरतानाचे दृश्य या फोटोत दिसत आहे.

रजनीकांत यांची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली असून आजही ते आपले मूळ विसरलेले नाहीत हे या फोटोवरुन स्पष्ट होत आहे. रजनीकांत यांची मातृभाषा मराठी असून त्यांनी अनेकदा आपल्या महाराष्ट्र कनेक्शनबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. त्यांच्या घरातील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांना महाराजांबद्दल वाटणारा आदर आणि प्रेम दाखवणाराच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.