अवकाळी पावसाचे संकट कायम ; हवामान खात्याचा इशारा

0

पुणे ;- पुणे कोकणवगळता राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचा इशारा आणि ढगाळ वातावरणामुळे तसेच पिकांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळण्याच्या भीतीने बळीराजा चिंतेत सापडला आहे.

विदर्भ व मराठवाड्यावरपावसाला अनुकूल असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र, काही भागांत तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका कायम आहे. रविवारी सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, सर्वात कमी तापमान पुणे येथे २०.९ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या ८ ते ११ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस व सोसाट्याचा वारा व गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.