रेल्वे बांधकाम विभागाला पत्र, उद्या रेल्वे मेगाब्लॉकची शक्यता !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरसोद-चिखली या महामार्गावरील नशिराबाद येथील रेल्वेलाइनवरील पुल क्र. ४३३/२ येथील काम सुरु आहे. या पुलावरील शटरिंग मटेरियल काढण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी न्हाईकडून रेल्वेच्या बांधकाम विभागाला पत्र दिले होते. रेल्वे बांधकाम विभागाकडून मध्य रेल्वेच्या वाहतूक नियंत्रण विभागाला २७ ऑगस्ट रोजी संयुक्त विद्युत व वाहतूक ब्लॉकची मागणी केली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून चार दिवसांपूर्वी चार दिवसांपूर्वी मनमाड ते नांदगाव दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनच्या चाचणी घेण्यात आली. त्यामुळे काही गाड्या रद्द तर, अनेक गाड्या उशिरा धावल्याने रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. आता नशिराबाद येथील महामार्गावरील पुलाच्या कामाबाबत २० जुलैला न्हाईने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाला १४ तासाचा ब्लॉक घेण्याबाबत पत्र दिले होते. या पत्रावरून मध्य रेल्वे भुसावळच्या बांधकाम विभागाने मध्य रेल्वे वाहतूक नियंत्रण विभागाला पत्र दिले आहे. यात २८ ऑगस्टपासून काम पूर्ण होईपर्यंत विद्युत व वाहतूक ब्लॉक घेण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे रेल्वेचा मेगा ब्लॉक झाल्यास पुन्हा रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघटण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.