वरणगाव भाजपतर्फ़े राहुल गांधींचा निषेध

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परिवाराला चोर म्हणून संपुर्ण ओ बी सी समाजाचा अपमान करून बदनामी करणारे कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा प्रतिमेवर शाई फेक करीत शहर भाजपाने निषेध व्यक्त केला

शहरातील बस स्थानक चौकात शहर भाजपाचे पदाधीकारी व कार्यकर्ते एकत्रीत येत खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संपुर्ण ओ बी सी समाजाची माफी मागण्याची मागणी केली
यावेळी सुनिल काळे , सुनिल माळी , मिलीद भैसे , गजानन वंजारी , हितेश चौधरी , गोलू राणे , योगेश माळी , भुषण माळी , शामराव धनगर , प्रविण चादणे , नंदू चौव्हाण , राहुल जंजाळे , गंभीर माळी , इत्यादी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.