करौली बाबांनी होम हवनची फी वाढविली ; आता लागतील अडीच लाख रुपये

0

कानपूर ,
लोकशाही न्यूज नेटवर्क

 

कानपूरच्या बिधनु येथील लवकुश आश्रमात डॉक्टरला मारहाण करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले करौली बाबा डॉ. संतोष सिंह भदौरिया यांनी शुक्रवारी भक्तांसमोर घोषणा केली की त्यांच्या जागेवर एक दिवसाचे हवन शुल्क आता २.५१ लाख रुपये असेल. आतापर्यंत त्याची किंमत दीड लाख रुपये होती. काही भक्तांचे म्हणणे आहे की, बाबांनी रागाच्या भरात असे सांगितले. शुक्रवारी एका दैनिकाच्या वार्ताहराने लवकुश आश्रमात जाऊन बाबांचे दर्शन घेतले.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शेतकरी नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, काही वर्षांत संतोष भदोरिया यांनी कोट्यवधींची संपत्ती जमवली. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची गर्दी होते. तर, आश्रमात भाविकांना १०० रुपयांची पावतीदेखील फाडावी लागते. आता, या बाबांनी वेगळीच घोषणा केलीय. ज्याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांना फीज आणि असाध्य रोगाच्या उपचारासाठी पैसे देतात, त्याप्रमाणे आम्हालाही पैसे द्यावे लागतील. १ एप्रिलपासून या बाबांनी यज्ञ, होमहवनची फीही वाढवली आहे.

बाबांना त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्काबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की, लोक उपचारासाठी डॉक्टरांनाही फी भरतात. ते असाध्य आजारांवर लाखो रुपये खर्च करतात, त्याचप्रमाणे इथेही शुल्क आहे.

दरम्यान, सभागृहात बसलेल्या सुमारे 200 भाविकांच्या मध्ये त्यांनी माईकद्वारे जाहीर केले की, 1 एप्रिलपासून जलद लाभासाठी करावयाच्या एका दिवसाच्या हवनाचे शुल्क 2.51 लाख रुपये असेल. आतापर्यंत हे शुल्क १.५१ लाख रुपये आहे.असे सांगितल्याने करौली बाबा पुन्हा चर्चेत आले आहेत .

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.