पुरनाड चेक पोस्टवर अवैधरित्या लाखोंची लूट; खडसेंचा आरोप

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील पुरनाड चेक पोस्ट नाका (Purnad Check Post Naka) येथे आरटीओ (RTO) अधिकारी व त्यांचे अनधिकृत पंटर हे शासनाचा महसूल कमी दाखवून अवैधरित्या मालट्रक वाहन चालक यांचेकडून रोजच दिवस रात्र ओव्हर लोडच्या नावाखाली लाखो रुपये जमा करून बनावट पावत्या देत आहे.

पुरनाड आरटीओ चेक पोस्ट नाका येथे ड्युटी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांचे मार्फत देवाण-घेवाण करून चेक पोस्टवर अधिकाऱ्यांची ड्युटी लावली जाते व त्यांच्याबरोबर ते आरटीओ इन्स्पेक्टर व काही अनधिकृत  पंटर आणतात आणि त्यांचे मार्फत अवैध हजार रुपयांची वसुली करून वाहनधारक चालकांकडून केली जाते.  हे पण प्रत्येक ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा वसुली करून पैसा गोळा करतात.

पंटरांकडून अवैध वसुली

दिवसभरातून ह्या पंटरांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करून जो आरटीओ इन्स्पेक्टर ड्युटी बजावतो, त्यांना त्यांचा हिस्सा काढून पैसे देतो.  इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून लाखो रुपये कमावण्याचे काम या ठिकाणी रोज चालत आहे.

बनावट पावती दिली जाते

तसेच पुरनाड चेक पोस्ट नाक्यावरून रोज अनेक वाहने मालट्रक, टॅकर, ट्रेलर, अवजड ट्राला, एसटी बसेस, डंपर, कंटेनर, फोर व्हीलर कार, ट्रॅक्टर, रिक्षा, टू व्हीलर अशा अनेक प्रकारची वाहने जात असतात. त्यात सागवानी लाकूड वाहतूक, कत्तलीसाठी नेली जाणारे गुरेढोरे, बुऱ्हाणपूरहुन महाराष्ट्रात आणला जाणारा विमल गुटखाच्या पुड्या तसेच गांजा असा नंबर दोनचा माल देखील वाहतुकीमधून पास केला जात असून आणि फक्त ओव्हरलोड या गोंडस नावाखाली दंड आकारून हजारो  रुपये जमा केले जाऊन त्यांना बनावट पावती दिली जाते.

 खडसेंनी भेट देऊन केली झाडाझडती

21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर पुरनाड फाट्यावरील चेकपोस्टवर आमदार एकनाथराव खडसे यांनी भेट देऊन झाडाझडती केली असता तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन झोल आढळून आला आहे. या चेकपोस्टवर प्रत्येक ट्रकमागे दोन हजार रुपयांची वसुली करण्यात येत असून या माध्यमातून आरटीओ अधिकारी दिवसाला दहा ते बारा लाखाचे कलेक्शन करत असल्याचा गंभीर आरोप आ. एकनाथराव खडसे यांनी (MLA Eknathrao Khadse)  केला आहे.

अधिवेशनात मांडणार प्रश्न 

काट्यावर वजन केले असता दीड टनाचा फरक आढळून येतो अशी तक्रार चालकांनी सुद्धा खडसेंकडे केली आहे. ओव्हरलोड माल उतरवण्यासाठी एक पंटर अवैधरित्या ठेवला आहे. वजन करण्यासाठी दुसरीकडे ट्रान्सफर केल्यास त्याची फोटोग्राफी केली पाहिजे, परंतु खालपासून वरपर्यंत मिलीभगत असून हप्ते पोहोचवली जातात, म्हणून कोणीही दखल घेत नाही. यापूर्वी देखील खडसेंनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. आता देखील पुढच्या अधिवेशनात आरटीओचा हा गंभीर प्रश्न खडसे विधानसभेत मांडणार आहेत.

 मनसेनेही केले आंदोलन

13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर शाखेच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे यांचे नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी पुरनाड चेक पोस्ट नाक्यावर अशाच अवैध वसुली बाबत एक दिवस तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून घोषणाबाजी केली.  भर पावसात मंडप टाकून ठिय्या मांडला होता. त्यांना आश्वासन देऊन सांगता करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.