पुण्यात चक्क खुलेआम गांजाची विक्री ! ३७ किलो गांजासह दोघे ताब्यात

0

पुणे :सार्वजनिक रस्त्यावर सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी समोर गांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने अटक केली असून त्यांच्याकडून ७ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा ३६ किलो ८९६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

हर्षल दिलीप बोरा (३१, रा. अरिहंत सोसायटी, सॅलेसबरी पार्क, स्वारगेट) आणि रवींद्र हनुमंत दुर्गुले (३५, रा. नांदगिरी, कोरेगाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन जण अवैधरित्या पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीच्या पार्किंग ग्राउंड समोरील सार्वजनिक रोडवर गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी यांना मिळाली होती. यानंतर सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३६ किलो ८९६ ग्रॅम गांजा, ६७ हजार किमतीचे ६ मोबाईल आणि ५ लाखांची एक कार जप्त केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.