पंतप्रधान मोदींचे भाऊ रुग्णालयात दाखल

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Prime Minister Narendra Modi)भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रह्लाद मोदी हे नरेंद्र मोदी यांच्याहून दोन वर्षांनी लहान आहेत. तर त्यांच्या ५ भावंडांपैकी चौथ्या क्रमांकावर आहेत. प्रह्लाद मोदी यांच्यावर किडनीसंबंधित आजारावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आलं आहे. प्रह्लाद मोदी अहमदाबादमध्ये राहत असून तिथे त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. तसंच एक टायर शोरूमही आहे.

प्रह्लाद मोदी २०१८ मध्ये चर्चेत आले होते. त्यावेळी गुजरात रास्त भाव दुकान आणि केरोसीनचा परवाना घेतलेल्या ग्राहकांमध्ये जोरदार वाद सुरू होते. याच विरोधात प्रह्लाद मोदींनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी ते गुजरात रास्त भाव दुकान मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष होते.

Leave A Reply

Your email address will not be published.