प्रशांत पाटील यांना बेस्ट सोशल वर्कर ऑफ द इयर ‘फार्मासिस्ट’ पुरस्कार

0

चिखली , लोकशाही न्यूज नेटवर्क

रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे सह सचिव प्रशांत ढोरे पाटील यांना सोशली पॉईंटस फाउंडेशन इंदोर (मध्य प्रदेश) द्वारा बेस्ट सोशल वर्कर ऑफ द एयर “फार्मासिस्ट” म्हणून राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित प्रजापती यांनी सांगितले की हा पुरस्कार समाजात बदल घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या देश विदेशातील असामान्य कार्य करणाऱ्या तीस व्यक्तींना हा पुरस्कार दिल्या जातो.

महाराष्ट्रातुन बुलढाणा जिल्ह्यातील प्रशांत ढोरे पाटील यांनी समाजहितार्थ राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावत असतात, शेतकऱ्यांच्या समाश्या सोडवण्यासह,विविध सामाजिक, राजकिय प्रश्नांवर निडरपणे आवाज उठवत असतात,आरोग्य क्षेत्रात “औषधनिर्माता” म्हणून काम करत असतांना वेळोवेळी रुघ्नांच्या समस्या सोडवत असतात त्यांचं उल्लेखनीय कार्य म्हणजे कोरोना काळात त्यांनी केलेल असामान्य कार्य ज्या वेळेस रक्ताचे नातेवाईक देखील रुघ्नाजवळ येत नव्हते तसल्या विदारक परिस्थितीत देखील त्यांनी स्वतः च्या जिवाची पर्वा न करता कोरोना रुघ्नांची केलेली मदत,निस्वार्थी सेवा,त्या आपत्कालीन परिस्थिती एकमेव शस्त्र म्हणजे सॅनिटायझर ते देखील उपलब्ध होत नसतांना विदर्भात सर्वात प्रथम बुलढाणा येथे अन्न व औषधी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे व अन्न व औषध निरीक्षक गजानन घिरके यांच्या मदतीने तसेच संजय इंडोले,राजेश जाधव यांच्या सहकार्याने एस के लॉड्रस कॉस्मेटिक इंडस्ट्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले होते.

त्यांनी प्रत्येक घटकातील व्यक्तीला केलेली निस्वार्थ मदत आणि विशेष म्हणजे आमच्याच प्रदेशातील (मध्य प्रदेश) मधील एक महिला बुलढाणा जिल्हा रुघ्नालय येथे कोरोना मुळे मृत झालेली असता परिस्थितीती अभावी त्याठिकानावरून कोरोना बाधित शव मध्य प्रदेशात आणता येत नसल्याने कार्य तत्परता दाखवून रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा बुलडाणा जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हा सहसचिव असलेले प्रशांत ढोरे पाटील यांनी नगरसेवक मोहन पर्हाड,केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल तायडे यांच्या सहकार्याने सदर मृत महिलेचे बुलढाणा येथेच स्वतः दफनविधी केले होते.

सामाजिक राजकिय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याने त्यांना याआधी बुलढाणा जिल्हा केमिस्ट संघटनेकडून “विषेश सेवा पुरस्कार” असेल जयपूर येथील हायपेज मीडिया द्वारे “इंडीया सोशल इम्पॅक्ट आवार्ड्स”ने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीने “राष्ट्रीय गौरव पुरस्कार” हा पुरस्कार व सन्मान देत असून त्यांना हा पुरस्कार जिवनात अधिकाधिक सामाजिक कार्य करण्यास प्रोत्साहन देईल असे सोशली पॉईंट्स फाउंडेशन इंदोर (मध्य प्रदेश)चे संस्थापक अमित प्रजापती व अध्यक्ष अभिषेक डेंबला यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.