पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘मराठी भाषा गौरव दिवस’ उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्यात येतो. पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव, येथे ‘मराठी राजभाषा दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री.गोकुळ महाजन यांनी श्री सरस्वती पूजन करून वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रसन्ना खिराडे आणि कु. भावेश महाजन यांनी केले. शाळेच्या परिपाठाच्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.ई.२ रोच्य विद्यार्थ्यांनी पसायदान सादर केले.

या प्रसंगी कु.दर्शील कोठारी या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व विषद केले. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यसाठी कवी कुसुमाग्रजांना मराठी भाषेचे शिल्पकार म्हणून संबोधले. जनसामान्यांना जोडणारी मराठी भाषा ही राजभाषा आहे ,मराठी संस्कृती जपायची असेल तर मराठी भाषेची आवड व तिचा आदर झालाच पाहिजे असे मत मांडले.

इ.६ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती..‘ हे बालगीत सादर केले. शाळेच्या हिंदी विभाग प्रमुख सौ. रंजना गवळी यांनी संतसाहित्याचा आधार घेत मराठी साहित्य का निर्माण केले,मराठी भाषेचे जतन का करावे यासारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. marathi राजभाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जावा. जागतिकीकरणात इंग्रजी भाषेचा अतिरेकी वापर होत असला तरी प्रादेशिक भाषेची अस्मिता जपण्याची जबाबदारी आपली आहे असे मत मांडले.

या दरम्यान मराठी विषय शिक्षिका सौ. स्नेहा बागुल यांनी कवी कुसुमाग्रज रचित ‘कणा’ ही कविता वाचून भावार्थ स्पष्ठ केला. विद्यार्थ्यांनी “लाभले आम्हास भाग्य,बोलतो marathi…” तसेच “ही मह्भूमी ही जन्मभूमी …” या गाण्यांवर मराठमोळे नृत्य सादर केले.

पोदार स्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत भाषा हे आपल्या अभिव्यक्तीचे अनमोल साधन आहे.सर्व भाषांना महत्व दिले पाहिजे असे मत मांडले.महाराष्ट्राची भाषा म्हणून मराठीचा वापर तसेच संवर्धन करावे .विद्यार्थ्यांनी ऐकून ,बोलून वाचून आणि लिहून भाषाकौशाल्य आत्मसात करावे व बहुभाषिक व्हावे असे आवाहनत्यांनी यावेळी केले.या प्रसंगाचे औचित्य साधून ”मराठी महाराष्ट्राची ‘हा विषय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखनासाठी देण्यात आला. कु.चरिता नारखेडे या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले.शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.