देवांग कोष्टी समाजातर्फे कॅलेंडरचे प्रकाशन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देवांग कोष्टी समाजातर्फे पिंप्राळा येथील सिल्क मिल जवळ मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार १७ रोजी रोजनिशी कॅलेंडर प्रकाशन करण्यात आले. तसेच समाजातील दोन ज्येष्ठ जोडपांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक चंद्रकांत पंधारे , देवांग कोष्टी समाज महाराष्ट्र अध्यक्ष मंदाकिनी टकले , मनपाच्या माजी सभापती सुजाता हाडा , नगरसेविका दीपाली काळे , डॉ. एम एस राव , पत्रकार योगेश अहिरे , महिला उपाध्यक्ष अर्चना आळंदे यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.