गोदावरी सर्जिकल स्ट्रायकरला प्रथम पारितोषिक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नुकत्याच मुक्ताईनगर येथे झालेल्या मेडिको कप २०२३ या टूर्नामेंटमध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयच्या गोदावरी सर्जिकल स्ट्रायकर टीमने युनिटी अकोला या टीमच्या विरोधात फायनल मध्ये धडाकेबाज विजय मिळवून टूर्नामेंटचे पहिले पारितोषिक पटकाविले.

या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी टीमचे अभिनंदन केले. या टीम मध्ये डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रेडिओलॉजीस्ट डॉ.कमलाकर रेड्डी, डॉ.तेजस बोरसे, डॉ. दिशांत पाटील, डॉ. पंकज राजपूत, डॉ.हिमांशू महाजन, डॉ.किशोर कदम, डॉ.कामरान खान यांचा सहभाग होता. त्यांनी कर्णधार डॉ.चैतन्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय प्राप्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्याम लोही यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त कशी बाळगावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आपल्या वाहनाचे आरसे याचे महत्त्व सांगताना सिग्नल चे पालन आणि हेल्मेट चा वापर खूप महत्त्वाचा आहे हे नमूद केले. त्याचप्रमाणे केवळ वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा उद्देश्य न ठेवता समाज प्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी रस्ता सुरक्षा संबंधित विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले आणि अचूक उत्तरे देणार्‍या विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. त्यात प्रथम वर्षाच्या साक्षी बारी, संजोग लहासे व प्रतीक मराठे या विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकावले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सरोज भोळे यांनी काम पाहिले. त्यांना प्रथम वर्षाचे प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथम वर्षाची विद्यार्थिनी श्वेता बोरसे हिने केले.

Leave A Reply

Your email address will not be published.