मधुकर साखर कारखान्याच्या परिसरात आढळलेल्या अजगराला जीवदान

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांच्या साहाय्याने जीवदान देण्यात येऊन त्याला वनविभागाच्या सहकार्याने जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

१६ जानेवारी रोजी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात एक मोठा अजगर आढळून आला. या अजगराला पाहताच ईगल एमपॉवर सेक्युरिटी या खाजगी कंपनीचे कर्मचारी दिपक कोळी व अतुल सपकाळे यांनी त्यांचे सुपरवाईजर सुलतान पिंजारी यांना कळविले. दरम्यान, त्यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. यात त्या अजगराला उमेश सपकाळे व दिपक कोळी व सुलतान पिंजारी या सर्पमित्रांनी त्या अजगराला सुखरूप पकडून त्या अजगराचे प्राण वाचवले.

सिक्युरिटी गार्ड व सुपरवायजर सुलतान पिंजारी यांनी पूर्व विभाग वन विभाग क्षेत्र अधिकार्‍यांना फोन द्वारे माहिती तात्काळ दिली. या अनुषंगाने त्या ठिकाणी तात्काळ वन विभागाचे कर्मचारी येऊन सुलतान पिंजारी, दीपक कोळी व उमेश सपकाळे यांनी या अजगराला वन विभागा कर्मचार्‍यांना पकडून दिले. यातून त्यांना मोठा अजगर त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

यावल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक तुकाराम लवटे, आगार रक्षक भैय्यासाहेब गायकवाड गोवर्धन डोंगरे, किष्णा शेळके आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.