जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
गेल्या तीन दशकांपासून स्मृतिचिन्ह व्यवसायात कार्यरत असणाऱ्या कलादर्श स्मृतिचिन्ह यांच्यातर्फे आयोजित स्मृतिचिन्ह प्रदर्शनाचे आज (दि.१६) सकाळी १० वाजता पु.ना.गाडगीळ कलादालनात संपन्न झाले.
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, आर्टिस्ट सुबोध सराफ, पीएनजीचे व्यवस्थापक श्री.पोतदार, क्लासिक आर्टस्चे हेमचंद्र काळुंखे, प्रा.राजेंद्र देशमुख, वैभव मावळे व कलारसिक उपस्थित होते.
रिंगरोडवरील पु.ना.गाडगीळ ॲण्ड सन्स यांच्या कलादालनात दि. १६ ते ३० एप्रिल दरम्यान सुटीचे दिवस सोडून असणाऱ्या या प्रदर्शनात कलादर्शने आजवर विविध संस्थांसाठी व कार्यक्रमांसाठी ॲक्रेलिक, काच, फोमशीट, पितळ, चांदी व सोने यापासून बनविलेल्या ९० अधिक कल्पक स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहेत. तरी जळगावकर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देवून स्मृतिचिन्हांचा कल्पक प्रवास अनुभवावा, असे आवाहन कलादर्शचे सचिन चौघुले यांनी केले आहे.