अश्लिल मॅसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय विवाहितेला इंस्टाग्रामवर अश्लिल मॅसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर विवाहिता आपल्या परिवारासह राहतात. २५ वर्षीय विवाहितेस इन्स्टाग्रामवरून दि १५ ऑक्टोबरपासून ते ८ नोव्हेबरपर्यंत विवाहितेच्या मोबाईल नंबरवर वारंवार अश्लील मेसेज पाठवत होता. तसेच एके दिवशी विवाहिता दुकानात वस्तू घेण्यासाठी गेली असता तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

याप्रकरणी संशयित आरोपी प्रेम नाईक (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ.राजेद्र उगले हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.