सट्टा व जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; ११ जणांना घेतले ताब्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात सुरू असलेल्या सट्टा व जुगाराच्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली आहे, यावेळी जुगाराचे साहित्य व रोकड हस्तगत केली असून ११ जणांना ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरूण परिसरातील अशोक किराणा चौकात काही जण सट्टा व जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. या गुप्त माहितीनुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.न. गणेश शिरसाळे, पो.ना. सचिन पाटील, चेतन सोनवणे, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, पो.कॉ. छगन तायडे यांनी मंगळवारी १९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता अशोक किराणा चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

सदर कारवाईत पोलीसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, ६ हजार ३०० रूपयांची रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर सिराज सैय्यद शेख सलीम (वय ४९, रा. शेरा चौक, मास्टर कॉलनी), शेख जावेद शेख सलीम (वय २८, रा. अशोक किराणा चौक), अरूण सुपडू भदाणे (वय ५०, रा. मेहरूण), विजय रामभाऊ सोनवणे (वय ६०, रा. राम नगर), पंकज अरूण महाजन (वय २३, रा. अयोध्या नगर), सुपडू चावदास सपकाळे (वय ४२, रा. सुनसगाव ता. भुसावळ), अजय ज्ञानेश्वर कोळी (वय ३५, रा. मोहाडी ता. जळगाव), मजीत शेख बाबू शेख (वय ४६, रा. रामेश्वर कॉलनी), कडू राजाराम परखड (वय ५९, रा. रामेश्वर कॉलनी), जगदीश श्याम पाटील (वय ३६, रा. मेहरूण) आणि लियाकत अली अजगर अली (वय ५३, रा. लक्ष्मी नगर जळगाव) या ११ जणांना ताब्यात घेतले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात पो.कॉ. छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.