‘पीएम – सूर्यघर मुफ्त बिजली योजने’ चा लाभ घेण्याचे आवाहन

0

जळगाव ;- ‘पीएम – सूर्यघर मुफ्त बिजली योजने ‘ मध्ये एक करोड घरात सौर उर्जा पोहचवण्यासाठी डाक विभागामार्फत सर्वेक्षण करण्यास सुरुवात झालेली आहे. अधिकाधिक लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे डाक विभागाकडून करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये आपणास जास्तीत जास्त रुपये 78000/- पर्यंत अनुदान देखील मिळणार आहे. आपण प्राथमिक नोंदणी केल्यानंतर सरकारने महाराष्ट्रासाठी निर्धारित केलेले कंपनी अधिकारी हे आपल्या गावात येवून प्रत्यक्ष भेट देतील तसेच पुढील काम निर्धारित कंपनी अधिकारी करणार आहेत.

या योजनेच्या सर्व इच्छुक नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाकडून करण्यात आले आहे. डाक विभागामार्फत पोस्टमन किंवा इतर कर्मचारी आपल्या घरी सर्वेक्षण करण्यासाठी येणार असून आपण त्याना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहनही अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.