महापालिकेची प्लास्टिक पिशव्या विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या रंगीत कॅरीबॅग व इतर बंदी असलेले साहित्य जप्त करण्यात आली आहे.

विक्रेते किशोर एकनाथ पाटील (रा. विठ्ठल पेठ) व राहुल सिंग (राहणार का.ऊ. कोल्हे शाळेजवळ)यांचे कडून साधारणतः ५०० किलो प्लास्टिक साहित्य जप्त करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड असा एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. म्ह्क्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागदेश लोखंडे, संदेश इंगळे, मुकादम दीपक भावसार, वालिदास सोनवणे, शरद पाटील यांनी कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.