भयंकर दुर्घटना.. 133 प्रवासी असलेले विमान कोसळले (व्हिडीओ)

0

चीन, लोकशाही न्यूज नेटवर्क

चीनमध्ये भयंकर विमान दुर्घटना घडली आहे. चीनमध्ये ‘बोइंग 737’ (Boeing 737) या प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला आहे. या विमानातून एकूण 133 प्रवासी प्रवास करत होते. याबाबतची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, चायना इस्टर्न एअरलाईन्सचे ‘बोइंग 737’ (Boeing 737) या विमानाने कुनमींग (Kunming) वरून गुआंझाऊ (Guangzhou) कडे उड्डाण घेतले होते. या विमानामध्ये एकूण 133 प्रवाशी होते. उड्डाणानंतर काही मिनिटांनी हे विमान गुआंग्शी भागातील वूझोऊ शहरातील डोंगराळ भागामध्ये कोसळले. विमान कोसळताच डोंगरावर आग लागली. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाळा भडकलेल्या दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम चीनमधील युन्नात प्रांतातील कुनमींग (Kunming) शहरातील चांगशुई (Changshui) विमानतळावरून दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी या विमानाने उड्डाण घेतले होते. नियोजित वेळापत्रकानुसार हे विमान ग्वांगडोंग प्रातातील गुआंझाऊ शहरतील विमानतळावर 3 वाजता उतरणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. यादरम्यान विमानाचा अपघात झाला.

https://twitter.com/TheLegateIN/status/1505820283734994947?s=20

हे विमान फक्त सहा वर्ष जुने असल्याची माहिती समोर आली आहे. 2015 मध्ये कंपनीने हे विमान खरेदी केले होते. बोइंग 737 MU 5735 या विमानामध्ये एकूण 162 सीट असून यातील 12 बिझनेस क्लास आणि 150 इकोनॉमी क्लासच्या सीट होत्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.