पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज सोहळा उत्साहात साजरा..!

0

पाळधी, ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाळधी येथे संत तुकाराम महाराजांचा ३७४ वा बीज उत्साह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम मंदिर येथे श्री संत तुकाराम महाराज यांचा प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले पूजन हे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन दिवस तुकाराम बीज म्हणून भक्ती भावाने नामस्मरण करीत विविध धार्मिक कार्यक्रमाने सर्वत्र साजरा केला जातो. यंदाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 374 वा वैकुंठ गमन सोहळा तुकाराम बीज म्हणून साजरा करण्यात आला.

पालखीचे प्रस्थान श्रीराम मंदिर येथून करण्यात आले तर सांगता गायत्री मंदिर येथे झाली. गायत्री मंदिर येथे तुकाराम बीजच्या निमित्ताने संजीव पाटील यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजीव पाटील यांनी समाजाने अंधश्रद्धेला बळी न पडता तुकारामांचे विचार आचरणात आणत समाज विकसित करण्याचे कार्य हाती घ्यावे तुकोबांनी आपल्या त्या काळातील चारशे एकर शेती असला संपत्तीचा त्याग करत समाजाचा हितासाठी कार्य केले. तसेच विद्रोही तुकोबा व तुकोबा ते शिवबा अशा विशेष विषयांवर वर समाज प्रबोधन केले.

यावेळी उद्योगपती दिलीप बापू पाटील, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, सरपंचपती शरद कोळी, श्रीकृष्ण साळुंखे, विजय देसाई, गोपाल कासट, शरद कासट, अनिल कासट, संजू देशमुख, एन डी पाटील, संजू महाराज, सुधाकर पाटील, गोकुळ पाटील, गोपाळ सोनवणे, भूषण महाजन, संजय पाटील, रमेश माणिक पाटील, संभाजी चव्हाण, व्ही आर पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष भगवान मराठे तसेच कैलास पाटील, श्री राम पाटील, संदीप पाटील, एडवोकेट आवारे, बाळकृष्ण पाटील, रमेश पाटील, किरण पाटील, गोकुळ नाना, रामचंद्र पाटील, सुभाष पाटील, चंदू पवार व सर्व समाज बांधव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन संजय पाटील सर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.